गणपती बाप्पा माझ्यासाठी
एवढं तरी करशील का
अंगात माझ्या शक्ती देउन
डोक्यात बुध्दी भरशील का
बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...
मनिमाउचे मौ मौ शेपुट
चिवचिवणे चिउताईचे
माकडदादाचे ते हुपहुप
गुरगुरणे वाघोबाचे
मला सांग तू या मित्रांशी
दोस्ती माझी करशील का
अंगात माझ्या शक्ती देउन
डोक्यात बुध्दी भरशील का
बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...
बाबा गेले ऑफिसात अन
आई गेली भूर कुठे
एकटाच मी घरात आणि
सगळे गेले दूर कुठे
उशीर त्यांना झाला तर तू
धम्मक लाडू देशील का
अंगात माझ्या शक्ती देउन
डोक्यात बुध्दी भरशील का
बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...
मला वाटते तेंव्हा होवो
घणघण घंटा शाळेची
अभ्यास सारा पटपट संपुन
मधली सुट्टी खेळाची
कितीही खेळलो तरी मला तू
पहिला नंबर देशील का?
अंगात माझ्या शक्ती देउन
डोक्यात बुध्दी भरशील का
बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...