स्वस्तिशरी गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धीदम्बल्लाळं मुरुडं विनायकं मढं चिंतामणी थेवरम्लेण्यांद्रिं गिरीजात्मजं सुवरदंविघ्नेश्वरं ओझरम्ग्रामोरांजण स्वस्थित: गणपती कुर्यात् सदा मंगलम्जय गणपती गुणपती गजवदनाआज तुझी पूजा देवा गौरीनंदनाकुडी झाली देऊळ छान काळजात सिंहासनकाळजात सिंहासन मधोमधी गजाननदोहीकडे रिद्धिसिद्धि उभ्या ललनाअष्टविनायका तुझा महिमा कसादर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असाअष्टविनायका तुझा महिमा कसागणपती, पहिला गणपतीमोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिरअकरा पायरी हो अकरा पायरी होनंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदरशोभा साजरी हो शोभा साजरी होमोऱ्या गोसाव्यानं घेतला वसागणपती, दुसरा गणपतीथेऊर गावचा चिंतामणीकहाणी त्याची लई लई जुनीकाय सांगू डाव्या सोंड्याचं नवाल केलं साऱ्यांनीविस्तार त्याचा केला थोरल्या पेशव्यानीरमा बाईला अमर केलं वृंदावनीजो चिंता हरतो मनातली चिंतामणीभगताच्या मनी त्याचा अजूनी ठसागणपती, तिसरा गणपतीसिद्धिविनायका तुझं सिद्धटेक गाव रंपायावरी डोई तुझ्या भगताला पाव रंदैत्यामारु कैकवार गांजलं हे नगरविष्णुनारायण गाई गणपतीचा मंतरटापूस मेलं नवाल झालं टेकावरी देऊळ आलंलांबरुंद गाभाऱ्याला पितळेचं मखरचंद्र सूर्य गरुडाची भोवती कलाकुसरमंडपात आरतीला खुशाल बसागणपती, चौथा गणपतीपायी रांजणगावचा देव महागणपतीदहा तोंड हिचं हात जणू मूर्तीला म्हणतीगजा घालितो आसन डोळं भरुन दर्शनसूर्य फेकी मूर्तीभर वेळ साधून किरणकिती गुणगान गावं किती करावी गणतीपुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसागणपती, पाचवा गणपतीओझरचा इघ्नेश्वर लांब रुंद होई मूर्तीजड जवाहीर त्याचं काय सांगू शिरीमंतीडोळ्यामंदी माणकं हो हिरा शोभतो कपाळातहानभूक हरपती हो सारा बघून सोहळाचारी बाजू तटबंदी मधी गणाचं मंदिरइघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसागणपती, सहावा गणपतीलेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरीगणाची स्वारी तयार गिरिजात्मक हे नावदगडामंदी कोरलाय् भक्तिभावरमती इथे रंका संगती रावशिवनेरी गडावर जल्म शिवाचा झाला होलेण्याद्री गणानी पाठी आशिर्वाद केला होपुत्राने पित्याला जन्माचा प्रसाद दिला होकिरपेने गणाच्या शिवबा धाऊनी आला होखडकात केले खोदकाम दगडात मंडपी खांबवाघ सिंह हत्ती लई मोठं दगडात भव्य मुखवटगणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचाआणि गिरिजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचादगडमाती रुपदेवाचं लेण्याद्री जसासातवा गणपती रायामहड गावाची महसूर वरदविनायकाचं तिथं एक मंदिरमंदिर लई सादसूद जसं कौलारू घरघुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्यावरसपनात भक्ताला कळं देवळाच्या मागं आहे तळंमूर्ती गणाची पाण्यात मिळं त्यानी बांधलं तिथं देऊळदगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती होवरदानाला विनायकाची पूजा कराया येती होचतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसाआठवा आठवा गणपती आठवापाली गावच्या बल्लाळेश्वरा आदिदेव तू बुद्धीसागरास्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख सूर्यनारायण करी कौतुकडाव्या सोंडेचे रूप साजिरे कपाळ विशाळ डोळ्यात हिरेचिरेबंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीतीब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसामोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया मोरया मयुरेश्वरा मोरयामोरया मोरया चिंतामणी मोरया, मोरया मोरया सिद्धिविनायक मोरयामोरया मोरया महागणपती मोरया, मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरयामोरया मोरया गिरिजात्मजा मोरया, मोरया मोरया वरदविनायक मोरयामोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया अष्टविनायक मोरयागीत - जगदीश खेबूडकरसंगीत - अनिल-अरुणस्वर - अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर,चंद्रशेखर गाडगीळ, मल्लेशचित्रपट - अष्टविनायक (१९७९)