नानापरिमळ दुर्वा शेंदूर शामिपात्रे !
लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे !
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे !
अष्टही सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रे !!१!!
जय देव जय देव जय मंगलमुर्ती
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती !!धु!!
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करती !
त्याची सकलही पापे विध्नेही हरती !
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती !
सर्वही पावती अंती भवसागर तरती !!२!!
शरणांगत सर्वस्वे भजती तव चरणी !
कीर्ती त्याची राहे जोवर शशी तरणी !
त्रिलोकी ते विजय अदभूत हे कारणी !
गोसावीनंदन रत नामस्मरणी !
जय देव जय देव..!!३!!