गणराज रंगि नाचतोपायी घागर्या किरती रुणझुणनाद स्वर्गी पोचतोगणराज रंगि नाचतो - 2
कटी पीतांबर कसून भर्जरीबाल गजानन, नर्तनास करितुंदिल तनु तरि चपल साजिरीलावण्ये साजतो
नारद तुंबरु करिती गायनकरी शारदा वीणा वादनब्रम्हा धरितो, तालहि रंगुनमृदंग धिमी वाजतो
देवसभा घनदाट बैसलीनृत्य गायने मने हर्षलीगौरीसंगे स्वये सदाशिवशिशुकौतुक पाहतो