सुख करता दुख हरता
वार्ता विघ्नाची - 2
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उठीशेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ता फळांची
जय देव जय देव
जय मंगलमूर्ती हो श्री मंगल मूर्ती
दर्शन मार्ते मन कामना पुरती
जय देव जय देव
रत्नखचित फरा तुझ गौरीकुमरा
चंदनाची उटी कुमकुम केशरा
हिरे जडित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया
जय देव जय देव
जय मंगलमूर्ती हो श्री मंगल मूर्ती
दर्शन मार्ते मन कामना पुरती
जय देव जय देव
लंबोदर पितांबर फणीवर वंदना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना
जय देव जय देव
जय मंगलमूर्ती हो श्री मंगल मूर्ती
दर्शन मार्ते मन कामना पुरती जय
देव जय देव