गणपती बाप्पा माझ्यासाठी
एवढं तरी करशील का
अंगात माझ्या शक्ती देउन
डोक्यात बुध्दी भरशील का
बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...

मनिमाउचे मौ मौ शेपुट
चिवचिवणे चिउताईचे
माकडदादाचे ते हुपहुप
गुरगुरणे वाघोबाचे
मला सांग तू या मित्रांशी
दोस्ती माझी करशील का
अंगात माझ्या शक्ती देउन
डोक्यात बुध्दी भरशील का
बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...

बाबा गेले ऑफिसात अन
आई गेली भूर कुठे
एकटाच मी घरात आणि
सगळे गेले दूर कुठे
उशीर त्यांना झाला तर तू
धम्मक लाडू देशील का
अंगात माझ्या शक्ती देउन
डोक्यात बुध्दी भरशील का
बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...

मला वाटते तेंव्हा होवो
घणघण घंटा शाळेची
अभ्यास सारा पटपट संपुन
मधली सुट्टी खेळाची
कितीही खेळलो तरी मला तू
पहिला नंबर देशील का?
अंगात माझ्या शक्ती देउन
डोक्यात बुध्दी भरशील का
बाप्पा मोरया... बाप्पा मोरया...


नानापरिमळ दुर्वा शेंदूर शामिपात्रे !
लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे !
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे !
अष्टही सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रे !!१!!


जय देव जय देव जय मंगलमुर्ती
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती !!धु!!


तुझे ध्यान निरंतर जे कोणी करती !
त्याची सकलही पापे विध्नेही हरती !
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती !
सर्वही पावती अंती भवसागर तरती !!२!!


शरणांगत सर्वस्वे भजती तव चरणी !
कीर्ती त्याची राहे जोवर शशी तरणी !
त्रिलोकी ते विजय अदभूत हे कारणी !
गोसावीनंदन रत नामस्मरणी !
जय देव जय देव..!!३!!




प्रथम तुला वंदितो, कृपाळा, गजानना गणराया - २


विघ्नविनाशक गणीजन पालक दुरित तिमिर हारका,
सुखकारक तू दुख विदारक, तूच तुझ्या सारखा,
वक्रतुंड ब्रम्हांड नायक, विनायक प्रभुराया,


सिद्धिविनायक तूच अनंता, शिवात्मजा मंगला,
सिंदूर वदना, विश्वाधीशा गणाधीशा वत्सला,
तूच ईश्वरा साह्य करावे, हा भाव सिंधू ताराया,


गजवदना तव रूप मनोहर, शुक्लांवर शिवसुता,
चिंतामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता,
रिद्धी सिद्धी वरा दयाळा, देई कृपेची छाया,


गीत : शांताराम नंदगावकर.
संगीत : अनिल - अरुण
स्वर : अनुराधा पौडवाल, पं. वसंतराव देशपांडे.
चित्रपट : अष्टविनायक (१९७९)



तू सुख कर्ता तू दुख हर्ता तूच कर्ता आणि करविता
मोरया मोरया मंगलमुर्ती मोरया.

ओंकारा तू तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धिविनायक,
मंगलमुर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक,
तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता,

मोरया मोरया मंगलमुर्ती मोरया..

देवा सरू दे माझे मीपण, तुझ्या दर्शने उजळो जीवन.
नित्य करावे तुझेच चिंतन. तुझ्या धुळीचे भाळी भूषण
सदैव राहो ओठांवरती, -२ तुझेच रे गुणगाया..

मोरया
मोरया मंगलमुर्ती मोरया

गीत : मधुसूदन कालेकर.
संगीत : अनिल - अरुण
स्वर : अनुराधा पौडवाल, पं. वसंतराव देशपांडे.
चित्रपट : अष्टविनायक (१९७९)




गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया - २
मंगलमुर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया

सिंधुरचार्चीत धवले अंग, चंदन उटी खुलावी रंग -२
बघता मानस होते दंग, जीव जडला चरणी तुझिया - २
आधी वंदू तुज मोरया..गजानना श्री गणराया...

गौरीतनया भालचंद्र, देवा कृपेच्या तू समुद्रा, तू समुद्रा - २
वरदविनायक करुणागारा, आवघी विघ्ने नेसी विलय
आधी वंदू तुज मोरया..गजानना श्री गणराया....

जय गणेश देवा


जय गणेश जय गणेश जय गणेश देवा
माता जाकी पार्वती पिता महा देवा - २
जय गणेश देवा

एक दंत दया वंत चार भूउजा धरी - 2
माथे सिंदोर शोये मुसे कि सवारी
पान चढे फुल चढे और चढे मेवा
लाडूं को भोग लागे संत कारे सेवा
जय गणेश देवा
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा
माता जाकी पार्वती पिता महा देवा
जय गणेश देवा

अंधान को आंख देत कोधीन को काय -२
बझान को पुरता देत निर्धन को माया -2
सूर्य शाम शरण आये सफल कि जिये सेवा
जय गणेश देवा
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा
माता जाकी पार्वती पिता महा देवा
जय गणेश देवा

बोलो गणपती बाप्पा कि
जय !


गणराज रंगि नाचतो
पायी घागर्‍या किरती रुणझुण
नाद स्वर्गी पोचतो
गणराज रंगि नाचतो - 2

कटी पीतांबर कसून भर्जरी
बाल गजानन, नर्तनास करि
तुंदिल तनु तरि चपल साजिरी
लावण्ये साजतो

नारद तुंबरु करिती गायन
करी शारदा वीणा वादन
ब्रम्हा धरितो, तालहि रंगुन
मृदंग धिमी वाजतो

देवसभा घनदाट बैसली
नृत्य गायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदाशिव
शिशुकौतुक पाहतो



हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया,
तुझ्याईना माणसाचा जन्म जाई वाया,
हे देवा दिली हाक उद्धार कराया,
आभाळाची छाया तुझी समिन्दाराची माया,
मोरया मोरया मोरया मोरया, मोरया मोरया मोरया मोरया
ओंकारचं रूप तुझं चराचरामंदी,
झाड-येली पाना संगे फुल तू सुगंधी,
भगताचा पाठीराखा, गरीबाचा वाली,
माझी भक्ती तुझी शक्ती एकरूप झाली,
देवा दिली हाक उद्धार कराया,
आभाळाची छाया तुझी समिन्दाराची माया,
मोरया मोरया मोरया मोरया, मोरया मोरया मोरया मोरया
आदी-अंत तूच खरा, तुच बुद्धिदाता,
शरण मी आलो तुला पायावर माथा,
डंका वाच दहादिशी, गजर नावाचा,
संकटाला बळ देई अवतार देवाचा,
देवा दिली हाक उद्धार कराया,
आभाळाची छाया तुझी समिन्दाराची माया,
मोरया मोरया मोरया मोरया, मोरया मोरया मोरया मोरया
मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी.

स्वस्तिशरी गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धीदम्‌
बल्लाळं मुरुडं विनायकं मढं चिंतामणी थेवरम्‌
लेण्यांद्रिं गिरीजात्मजं सुवरदंविघ्नेश्वरं ओझरम्‌
ग्रामोरांजण स्वस्थित: गणपती कुर्यात्‌ सदा मंगलम्‌
जय गणपती गुणपती गजवदना
आज तुझी पूजा देवा गौरीनंदना
कुडी झाली देऊळ छान काळजात सिंहासन
काळजात सिंहासन मधोमधी गजानन
दोहीकडे रिद्धिसिद्धि उभ्या ललना
अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
अष्टविनायका तुझा महिमा कसा
गणपती, पहिला गणपती
मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर
अकरा पायरी हो अकरा पायरी हो
नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर
शोभा साजरी हो शोभा साजरी हो
मोऱ्या गोसाव्यानं घेतला वसा
गणपती, दुसरा गणपती
थेऊर गावचा चिंतामणी
कहाणी त्याची लई लई जुनी
काय सांगू डाव्या सोंड्याचं नवाल केलं साऱ्यांनी
विस्तार त्याचा केला थोरल्या पेशव्यानी
रमा बाईला अमर केलं वृंदावनी
जो चिंता हरतो मनातली चिंतामणी
भगताच्या मनी त्याचा अजूनी ठसा
गणपती, तिसरा गणपती
सिद्धिविनायका तुझं सिद्धटेक गाव रं
पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं
दैत्यामारु कैकवार गांजलं हे नगर
विष्णुनारायण गाई गणपतीचा मंतर
टापूस मेलं नवाल झालं टेकावरी देऊळ आलं
लांबरुंद गाभाऱ्याला पितळेचं मखर
चंद्र सूर्य गरुडाची भोवती कलाकुसर
मंडपात आरतीला खुशाल बसा
गणपती, चौथा गणपती
पायी रांजणगावचा देव महागणपती
दहा तोंड हिचं हात जणू मूर्तीला म्हणती
गजा घालितो आसन डोळं भरुन दर्शन
सूर्य फेकी मूर्तीभर वेळ साधून किरण
किती गुणगान गावं किती करावी गणती
पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा
गणपती, पाचवा गणपती
ओझरचा इघ्नेश्वर लांब रुंद होई मूर्ती
जड जवाहीर त्याचं काय सांगू शिरीमंती
डोळ्यामंदी माणकं हो हिरा शोभतो कपाळा
तहानभूक हरपती हो सारा बघून सोहळा
चारी बाजू तटबंदी मधी गणाचं मंदिर
इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा
गणपती, सहावा गणपती
लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरी
गणाची स्वारी तयार गिरिजात्मक हे नाव
दगडामंदी कोरलाय्‌ भक्तिभाव
रमती इथे रंका संगती राव
शिवनेरी गडावर जल्म शिवाचा झाला हो
लेण्याद्री गणानी पाठी आशिर्वाद केला हो
पुत्राने पित्याला जन्माचा प्रसाद दिला हो
किरपेने गणाच्या शिवबा धाऊनी आला हो
खडकात केले खोदकाम दगडात मंडपी खांब
वाघ सिंह हत्ती लई मोठं दगडात भव्य मुखवट
गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा
आणि गिरिजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा
दगडमाती रुपदेवाचं लेण्याद्री जसा
सातवा गणपती राया
महड गावाची महसूर वरदविनायकाचं तिथं एक मंदिर
मंदिर लई सादसूद जसं कौलारू घर
घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्यावर
सपनात भक्ताला कळं देवळाच्या मागं आहे तळं
मूर्ती गणाची पाण्यात मिळं त्यानी बांधलं तिथं देऊळ
दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती हो
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा
आठवा आठवा गणपती आठवा
पाली गावच्या बल्लाळेश्वरा आदिदेव तू बुद्धीसागरा
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख सूर्यनारायण करी कौतुक
डाव्या सोंडेचे रूप साजिरे कपाळ विशाळ डोळ्यात हिरे
चिरेबंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा
मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया
मोरया मोरया चिंतामणी मोरया, मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया
मोरया मोरया महागणपती मोरया, मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया, मोरया मोरया वरदविनायक मोरया
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया अष्टविनायक मोरया
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - अनिल-अरुण
स्वर - अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर,
चंद्रशेखर गाडगीळ, मल्लेश
चित्रपट - अष्टविनायक (१९७९)


शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को
दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहर को
हाथ लिये गुड लद्दू साई सुखर को
महिमा काहे न जाय लागत हून पद को
जय जय जय जय जय
जय जय जी गणराज विद्यासुखदाता
धान्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव

अस्थ सिधी दासी संकट को बैरी
विघ्न विनाशन मंगल मुरत अधिकारी
कोटी सुरज प्रकाश ऐसी छबी तेरी
गंडस्थळ मदमस्तक झूल शशी बेहारी
जय जय जय जय जय
जय जय जी गणराज विद्यासुखदाता
धान्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता
जय देव जय देव

भावाभागात से कोई शरणागत आवे
संतती संपत्ती सबही भरपूर पावे
ऐसे तुम महाराज मोको अति भावे
ग़ोसावीनन्दन निशिदिन गुण गावे
जय जय जय जय जय
जय जय जी गणराज विद्यासुखदाता
धान्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता
जय देव जय देव






About this blog