वंदितो तुजला गजवदना
सिंदुर वदना तुजला नमितो, तु अमुची प्रेरणा
सुखकर्ता तू दु:ख हरोनिया, तारी प्रभु सकळा
विघ्नविनाशक म्हणती तुजला, तू आमची प्रेरणा
वंदितो तुजला गजवदना........
सर्व सुखाचा तू प्रभुदाता, विद्येच्या देवा
जनजीवनी तुच शुभकरा, शुभदिन फुलवावा
कर्पुगौरा गणनायक तू , गाऊनी तव भजना
वंदितो तुजला गजवदना.........